अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी; महाविद्यालयीन तरुणीवर महिनाभर अत्याचार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमध्ये आरोपीने एका महाविद्यालयीन तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला बदनामीची धमकी देत तिच्यावर महिनाभर अत्याचार केले आहेत. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला पुन्हा बदनामीची धमकी देत तिच्याकडे पैशाची मागणी केली. यानंतर या पीडित तरुणीने घाबरून आपल्याजवळील आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीला दिले. तरीदेखील हा आरोपी तिला त्रास देत होता. यामुळे पीडितेने आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

आरोपीचे नाव सोहेल अख्तर सय्यद असे असून तो अहमदनगरमधील मुकुंदनगर येथील रहिवासी आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. एकत्र शिक्षण घेत असताना आरोपीने पीडितेशी मैत्री करून तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले. यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. आरोपीने 19 मे ते 17 जून दरम्यान महिनाभर तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केला. आरोपीने पीडितेवर सोलापूर रोडवरील लॉज आणि चांदबीबी महाल परिसरात अनेकवेळा बलात्कार केला.

हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, पीडितेकडे पैशाची मागणीदेखील केली. यामुळे पीडितेने बदनामी होण्याच्या भीतीने आपल्याजवळील 8 ग्रॅम सोन्याचे दागिने आरोपीला दिले. यानंतरसुद्धा आरोपी तिला त्रास देतच राहिला. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार, धमकी आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.