सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे छोट्या नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. यामध्ये शाळेत मुलांना घेऊन जाताना दुचाकीसह वडिल आणि दोन मुले पाण्यात वाहून (swept away by flood waters) जात होती. मात्र सुदैवाने त्यांचा जीव (swept away by flood waters) वाचला आहे.
काय घडले नेमके?
सकाळी शाळेची वेळ असल्याने एक व्यक्ती दुचाकीवरुन आपल्या दोन मुलांना शाळेत सोडायला चालला होता. पुलावरुन पुराचे पाणी वाहत असताना देखील या व्यक्तीने पुराच्या पाण्यात दुचाकी (swept away by flood waters) नेली. पुलावर पाणी अधिक असल्यामुळे दुचाकी घसरली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली. यामुळे दुचाकीवरील बाप- लेकरे पाण्यात गटांगळ्या (swept away by flood waters) खाऊ लागले.
काळ आला होता पण… पुरात वाहून जाणाऱ्या बाप- लेकरांचा थोडक्यात बचावला जीव pic.twitter.com/kV2pFUxETQ
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 15, 2022
यावेळी तेथे उपस्थित बाबासाहेब शेख यांनी मागचा पुढचा विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेत या तिघांना बाजूला (swept away by flood waters) ओढले. शेख यांच्या मागोमाग दत्ता चांदणे, शशिकांत ओहोळ आणि प्रतिक रोकडे यांनी मदतीसाठी पाण्यात उडी घेतली आणि या तिघा बाप-लेकरांचा जीव वाचवला. यानंतर उपस्थित लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…