Tiktok Blackout Challenge News: टिक टॉकवर ब्लॅकआउट चॅलेंज खेळताना मुलीचा मृत्यु, इटलीमध्ये खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रोम । टिकटॉक (TikTok News) वर कथितपणे ब्लॅकआउट चॅलेंज (Blackout Challenge) खेळणार्‍या एका 10 वर्षाच्या मुलीच्या मृत्यूमुळे इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. तेथील सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, अनेक संघटनांनी देशातील या सोशल नेटवर्क्सवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बाथरूममध्ये मुलगी बेशुद्ध पडली होती
मृत मुलगी बाथरूममध्ये मोबाइल फोनसह बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. मृताच्या 5 वर्षाच्या बहिणीने बुधवारी तिला बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पाहिले. नंतर पलेर्मो हॉस्पिटलमध्ये या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतक मुलीचा फोन ताब्यात घेतला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.

टिक टॉक जारी केले स्टेटमेंट
चीनी कंपनी बाईटडन्सची (ByteDance) मालकी असलेल्या टिक टॉकने शुक्रवारी सांगितले की, या मुलीने अशा चॅलेंजमध्ये भाग घेतला होता असे दर्शवणारा कोणताही कंटेन्ट आपल्या साइटवर आढळला नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांना तपासात मदत करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. टिक टॉकच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘टिक टॉक कम्युनिटीची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. आणि हे करण्यासाठी, आम्ही कोणत्याही धोकादायक वर्तनास प्रोत्साहित करणार्‍या कोणत्याही कंटेन्टची जाहिरात करत नाही.

मुलीचे वडील म्हणाले – अशी कोणतीही आशा नव्हती
विशेष म्हणजे तरूणांकडून केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या धोकादायक चॅलेंज बाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. मृत मुलीच्या आई-वडिलांनी ‘ला रेपब्लिका’ या वृत्तपत्राला सांगितले की, त्यांच्या दुसऱ्या मुलीने तिची मोठी बहिण ब्लॅकआउट खेळत असल्याचे सांगितले होते. मुलीच्या वडिलांनी त्या वृत्तपत्राला सांगितले की, ‘आम्हाला काहीही माहित नाही. ती या गेममध्ये भाग घेत होती हे आम्हाला माहित नव्हते. आम्हाला फक्त एवढेच माहिती आहे की, आमची मुलगी टिक टॉकवर डान्स आणि व्हिडिओ पाहते. आम्हाला अशा कोणत्याही घटनेची अपेक्षा नव्हती.’

मुलीच्या मृत्यूमुळे इटलीमध्ये संताप
मुलीच्या मृत्यूनंतर संपूर्ण इटलीमध्ये संताप पसरला आहे आणि आता या सोशल नेटवर्क्सवर कडक कारवाई करण्याची मागणी अनेक लोकांकडून केली जात आहे. इटलीच्या बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा लिसा रोंझुली म्हणाल्या, “सोशल नेटवर्क्स एक जंगल होऊ शकत नाही जिथे सर्वकाही करण्यास परवानगी आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.