हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती घसरल्याने देशांतर्गत बाजारपेठेत सोने पुन्हा स्वस्त झाले आहे. शुक्रवारी दिल्ली स्पॉट मार्केटमधील सोन्याच्या किंमती 94 रुपयांनी घसरल्या. त्याचबरोबर चांदीच्या किमतींमध्ये या काळात प्रति किलो 782 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमती पुन्हा कमी होणार असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. मागील सत्रात सोन्याच्या व चांदीच्या किंमतीत घट झाली होती कारण सुरुवातीच्या व्यापारात डॉलर निर्देशांक बळकट झाल्यामुळे, परंतु बेरोजगारी आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स निर्देशांकातील आकडेवारीमुळे आर्थिक रिकव्हरीची आशा हादरली. यामुळे सोने व चांदीच्या दरात कमी खरेदी दिसून आली.
सोन्याचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 53,084 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून घसरले आणि ते प्रति 10 ग्रॅम 52,990 रुपये झाले. या काळात प्रति 10 ग्रॅमच्या किंमती 94 रुपयांनी खाली आल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 52390 रुपयांवर आली आहे.
चांदीचे नवीन दर
सोन्यापेक्षा चांदीच्या किंमती शुक्रवारी वाढल्या आहेत. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 68,480 रुपयांवरून वाढून 69,262 रुपये झाली आहे. या कालावधीत किंमतींमध्ये 782 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा दर प्रति किलो 67390 रुपयांवर पोहोचला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.