मुंबई । राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून म्हणजे 22 मार्च पासून ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत किती पोलिसांना कोरोनाची लागण झाली याची आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील 11 पोलीस अधिकारी व 38 पोलिसांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मिळाली आहे.
राज्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी शासनाचे आदेश पाळून घरातच थांबावे व विनाकारण रस्त्यांवर फिरू नये यासाठी पोलीस दिवसरात्र बंदोबस्तावर तैनात आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना अशा धोकादायक वातावरणात पोलीस तरीही रस्त्यावर आपली ड्युटी बजावत आहेत.
दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होणं ही राज्याची चिंता वाढवणारी बाब आहे. विनाकारण, बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करतेवेळी पोलिसांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. नागरिक कोरोनाच्या संकटापासून दूर राहावेत म्हणून पोलीस कर्मचारी बाहेर तैनात आहेत. मात्र, त्यांच्यावरच हल्ले होत असेल तर कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.
Total 11 Police Officers and 38 Policemen tested positive for #COVID19, since 22nd March till 4 am today: Maharashtra Police
— ANI (@ANI) April 21, 2020
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”.