रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे तुम्ही जिंकलात? धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बालात्काराची तक्रार रेणू शर्मा या महिलेने परत घेतल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे आपण जिंकलो असे जर तुम्ही समजत असाल तर धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात असं मत देसाई यांनी व्यक्त केले आहे.

तृप्ती देसाई यांनी रेणू शर्मा आणि तिच्या वकिलांवर धनंजय मुंडे यांनी दबाव तंत्र वापरून तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. तृप्ती देसाई यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर टिका केली आहे.

त्यांनी या व्हिडिओत ‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने मोठ्या हिम्मतीनं अत्याचाराच्या संधर्भात तक्रार दाखल केली होती, परंतू पोलीसांनी सुरूवातीला तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर या प्रकरणाचं राजकारण करण्यात आलं. आणि रेणू शर्मा नावाची महिलाच कशा पध्दतीनं चुकीची आहे, तिला बदनाम करण्यास सुरूवात झाली. ती कशी चारित्र्यहीन आहे, ब्लॅकमेलर आहे, अशा पध्दतीनं संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like