नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलेले एक ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. मंजुरल इस्लाम राणा या क्रिकेरटच्या जन्मदिनानिमित्त हे ट्विट करण्यात आले आहे. २००७ मध्ये मंजुरल इस्लाम राणा याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हे ट्विटमधील इंग्रजी भाषेमुळे चर्चेत आले आहे. या वायरल ट्विटनंतर यूझर्स याचं गांभीर्य समजून सांगत हे ट्विट डिलीट करण्याची मागणी करत आहेत. हे ट्विट आता डिलीट केले आहे. या ट्विटचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे. Happy Birthday to Manjural Islam Rana, youngest Test Cricketer to die at the age 22 years and 316 days.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटमध्ये हॅपी बर्थडे मंजुरल इस्लाम राणा. 22 वर्ष आणि 316 दिवस, सर्वात कमी वयात निधन झालेला तरुण कसोटी क्रिकेटपटू असा मजकूर लिहिला आहे. तसेच या ट्विटसोबत क्रिकेटरचा एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. या ट्विटवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निदान इंग्रजी तरी नीट लिहायची असा सल्लादेखील अनेक लोकांनी दिला.
मंजुरल राणा हे बांगलादेशचे क्रिकेटर होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ६ कसोटी आणि २५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. १६ मार्च २००७ मध्ये झालेल्या एका अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी त्यांचा अपघात झाला तेव्हा ते २२ वर्षांचे होते.