हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे अनेक देशांमध्ये कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही आहे. म्हणूनच, हा संसर्ग टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सोशल डिस्टंसिंग. हेच लक्षात घेऊन ट्विटरने आपल्या कर्मचार्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी आपल्या कर्मचार्यांना कायमचे वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय दिला आहे. याचा अर्थ असा की आता कोविड-१९ चा उच्चटन झाल्यानंतरही ट्विटरचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करू शकतील.
ट्विटर, फेसबुक, अल्फाबेट (गूगल) आणि इतरही अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी ही पावले उचलली आहेत. त्याचबरोबर कंपन्यांनी आता आपल्या सर्व कर्मचार्यांना या वर्षाच्या अखेरपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. डोर्सी यांनी आपल्या सर्व कर्मचार्यांना मंगळवारी ई-मेलद्वारे अनिश्चित काळासाठी वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय दिला आहे.मात्र हा पर्याय कार्यालयातील सफाई कामगार आणि सुरक्षा कर्मचार्यांना लागू होणार नाही, परंतु जे लोक ऑनलाइन किंवा संगणकावर काम करतात त्यांनाच लागू होईल. ट्विटरची नवी दिल्ली, लंडन आणि सिंगापूरसह जगभरात ३५ कार्यालये आहेत.
सप्टेंबरपूर्वी कार्यालय सुरू होण्याची शक्यता नाहीः ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी
ट्विटरच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की आम्ही विचारशील आहोत. आम्ही अशा कंपन्यांपैकी एक आहोत ज्यांनी प्रथम वर्क फ्रॉम होम मॉडेल सुरू केले. डोर्सी म्हणाले की, सप्टेंबरपूर्वी ट्विटरचे कार्यालय सुरू होण्याची सुतारामही शक्यता नाही. ट्विटर ही पहिल्या टेक कंपन्यांपैकी एक होती ज्यांनी पहिलेच आपल्या ५००० कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम करणे अनिवार्य केले.
जुलैमध्ये फेसबुक-गूगलचे कार्यालय सुरू होऊ शकते
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन इंडियाने आपल्या कर्मचार्यांना ऑक्टोबरपासून काम करण्यास परवानगी दिली आहे. ६ जुलैपासून फेसबुक आपले कार्यालय सुरू करेल तसेच गूगल कर्मचारीही जुलैच्या सुरूवातीस कार्यालयात जाऊ शकतात, परंतु बहुतेक लोक हे वर्क फ्रॉम होमच करतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.