Birthday Boy च्या ‘त्या’ प्रश्नावर पुणे पोलिसांचा भन्नाट रिप्लाय !

Pune Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या देशात दररोज ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी राज्याचे पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.

सध्या राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांना आपला वाढदिवस आणि पार्ट्या साजरा करता येत नाहीत. यामुळे एका व्यक्तीने ट्विटरवर पुणे पोलिसांना टॅग करत वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यासंदर्भात परवानगी मागितली आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी काय करावे असे देखील विचारले आहे. त्या व्यक्तीच्या प्रश्नाला पुणे पोलिसांनी आपल्या खास शैलीत भन्नाट रिप्लाय दिला आहे.

काय आहे प्रकरण
शिवानंद दसरवार नावाच्या व्यक्तीने पुणे पोलिसांना टॅग करत ‘सर, 1 मे रोजी माझा वाढदिवस आहे. माझे मित्र पार्टीसाठी मागे लागले आहेत. त्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीसाठी किती लोकं हजर राहू शकतात. आणि पार्टी देण्यासाठी काय करावं लागेल.’ असे विचारले आहे. त्याच्या या ट्विटला पोलिसांनी आपल्या खास शैलीत भन्नाट रिप्लाय दिला आहे.

पोलिसांचा ‘त्या’ ट्विटला रिप्लाय
पुणे पोलिसांनी शिवानंद दसरवार याच्या ट्विटला, ‘तुमच्या मित्रांना लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर जायचं असेल तर त्यांना आमचा नंबर द्या. आम्ही त्यांना “पार्टी”साठी आमंत्रित करू. वाढदिवसाच्या ‘अ‍ॅडव्हान्स’ मध्ये शुभेच्छा. घरीच राहा, सुरक्षित राहा!’ अशा प्रकारे रिप्लाय दिला आहे. पुणे पोलिसांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. शिवानंद दसरवार याच्या ट्विटवर ‘पुढच्या वर्षी वाढदिवस साजरा करायचा असेल, तर घरातच राहा,’ अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे.