धक्कादायक ! दहशतवादी हल्ल्याचे नाटक केल्याप्रकरणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना अटक

0
41
Girl arrested
Girl arrested
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे नाट्यकर्म केल्याच्या आरोपाखाली भारतीय जनता पक्षाचे दोन कार्यकर्ते आणि त्यांच्या दोन वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोमवारी भाजप कार्यकर्ते इश्फाक मीर आणि बशरत अहमद आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुपवाडा येथील गुलगाम येथे शुक्रवारी रात्री हल्ला केला आणि यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मोहम्मद शफी मीर यांचा मुलगा इशफाक याच्या हाताला दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. प्राथमिक तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की,”सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात इशफाक जखमी झाला.”

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की,”सतत चौकशी करून आरोपींनी अधिक सुरक्षा मिळवण्यासाठी हा हल्ला केल्याची कबुली दिली.” या सर्वांना सोमवारी कुपवाडा येथील न्यायालयात हजर केले असता तिथून त्यांना सात दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्यात आले. दरम्यान, भाजपने जिल्हाध्यक्षांना निलंबित करून अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. काश्मीरचे भाजप प्रवक्ते जीएम मीर यांना 25 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here