वाळूच्या कारणातून झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा खून, तीनजण जखमी माण तालुक्यातील नरवणे येथील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

नरवणे (ता. माण) येथे बुधवारी वाळूच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोघांचा खून करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत नाथा जाधव आणि विलास धोंडिबा जाधव अशी मारहाणीत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत आणखी तीन गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे नरवणे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस तैनात करण्यात आले असून, माणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.