शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद होणार?; उदय सामंत म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे कि नाही याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली. “आजच्या बैठकीत कोविड 19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली. या संदर्भात उद्या निर्णय जाहीर करू,” असे सामंत यांनी ट्विटद्वारे सांगितले.

मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे आज पार पडलेल्या बैठकीतीळ चर्चेबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आज सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक ऑनलाईन पार पडली. कोविड 19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली. या संदर्भात निर्णय उद्या सायंकाळी 4 वाजता जाहीर करू, असे ट्विटमध्ये सामंत यांनी म्हंटले आहे.

सध्या राज्यातील अनेक महाविद्यालयांच्या परीक्षा सुरु आहेत. तसेच अभ्यासक्रम आणि महाविद्यालयेही सुरु आहेत. कोरोनाचे प्रमाण जास्त वाढले तर या ठिकाणी महाविद्यालये ठेवण्यासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना करता येतील, याबाबत आता मंत्री उडत सामंत यांच्याकडून उद्या माहिती दिली जाणार आहे.