हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण की, नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संजय राऊत देखील असणार आहेत. आज हे दोघेजण सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतील. त्यामुळे सध्या त्यांच्या या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आज सायंकाळच्या वेळी सिल्व्हर ओक बंगल्यावर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जाणार आहेत. या भेटीदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपा बाबत चर्चा होईल असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेले नाही. तसेच ही भेट कोणत्या कारणासाठी होत आहे हे देखील या नेत्यांकडून सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे या भेटीला घेऊन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर, या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. तर कालच ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यंदाच्या या निवडणुकांमध्ये शरद पवारांना फारसे यश आल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे आता शरद पवार गट लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले असल्यामुळे राजकिय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.