राज्याची अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मोठी घोषणा होणार? मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली विशेष मंत्र्यांची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुले संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. नुकतेच केंद्र सरकारने देशाची आर्थिक घडी पूर्ववत बसवण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा करत २० लाख कोते रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले. आता राज्य सरकार हि अशाप्रकारची एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्या मंत्रांची एक बैठक बोलावली असून यामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मोजक्या मंत्रांची एक बैठक गुरुवारी बोलावली आहे. यामध्ये राज्याच्या सद्य परिस्थितील अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच कोरोना संकटानंतर येणाऱ्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत अभ्यासकरून कोरोनंतरच्या उपाययोजना सुचवण्यासाठी एक एक्सपर्ट कमिटी तयार करण्यात आली असून आता या कमिटीने आपला रिपोर्ट राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला आहे. केबिनेट सबकमिटीचे सभासद या बैठकीला व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा सहभागी होऊ शकतात.

Leave a Comment