हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. दरम्यान थोड्याचवेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लता मंगेशकर या राहत असलेल्या ‘प्रभुकुंज’ येथे अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत.
लता मंगेशकर यांची आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी प्राणज्योत मालवली. गेल्या 28 दिवसांपासून त्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, काल त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दुपारी 12.15 वाजता त्यांचे पार्थिव ब्रीच कँडितून परेड रोड येथील त्यांच्या प्रभू कुंज येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. तसेच ते दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. यावेळी लतादीदींच्या प्रभुकुंज येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंत्यदर्शनासाठी जाणारा आहेत.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी मुंबईत निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्या वरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.