हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. मुंबईतील विधानभवनात ठाकरे सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार यांनी राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दृष्टीने एक टाकलेले पाऊल आहे. जे जे काही शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत. या पुढे सुद्धा करणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. म्हणाले की, आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यांनी राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दृष्टीने एक टाकलेले पाऊल आहे. जे जे काही शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1576418862719711
मी ठामपणे सांगतो कि उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा जनतेसाठी तसेच सर्व माता, भगिनींचा विकास करणारा अर्थसंकल्प आहे. आणि त्यांना आधार देणारा आहार. आमी खात्री आहे कि जनताही त्याचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे यांनी म्हंटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडली आहे.