हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यातील विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. राज्यपालांचे वक्तव्य नीचपणाचे आहे असं म्हणत या राज्यपालांना कोल्हापूरी जोडा दाखवण्याची गरज आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यपालांची स्क्रिप्ट मुंबईतून येते कि दिल्लीतून येते हे माहित नाही पण त्यांनी आज कहर केला असं उद्धव ठाकरेंनी म्हंटल. हे विधान अनावधानाने आलेलं विधान नाही. यापूर्वी देखील राज्यपालांनी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त विधान करत महाराष्ट्राचा अपमान केला होता. समाजामध्ये आणि जातीजाती मध्ये फूट पाडणाऱ्या या कोश्यारीना घरी पाठवायचा कि तुरुंगात पाठवायचं याचाही विचार व्हायला पाहिजे असं मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं.
राज्यपालांचे विधान नीचपणाचे आहे. महाराष्ट्रात राहून इथलं मीठ खाऊन नमखहरामी करणारे हे राज्यपाल आहेत. जाणून बुजून राज्यपाल महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. आम्ही रक्त सांडून मुंबई मिळवली आहे, राज्यपालांनी आंदणात आणून दिलेली नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले
नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच; मनसे आक्रमक
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/SI7wuRzPDh@HelloMaharashtr @GajananKaleMNS
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 30, 2022
राज्यपाल नेमकं काय म्हणाले-
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही भगसिंह कोश्यारींनी म्हंटल.