हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हर घर तिरगां या मोहिमेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. फक्त तिरंगा फडकावून कोणी देशभक्त होत नाही. घराचा नाही पत्ता.. अन यांचं हर घर तिरंगा, अनेक जणांकडे घर नाही, मग तिरंगा फडकावणार कुठे असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाचा आज ६२ वा वर्धापनदिन आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते.
अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा. फक्त तिरंगा फडकावून कोणी देशभक्त होत नाही. 75 वर्ष झाली आहे. घर घर तिरंगा. लावा. तुमच्याकडे घरच नाही तर तिरंगा लावणार कुठे?? नुसता तिरंगा लावून चीन परत जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच यावेळी त्यांनी एक व्यंगचित्रही सादर केलं. सरकार पाडायला पैसे आहेत पण लष्करासाठी नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर केली.
दरम्यान, देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं विधान काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलं होत, त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाना साधला. नड्डांनी जे वक्तव्य केले ते लोकशाहीला घातक आहे. तसेच त्यांनी ज्यांना प्रदेशाध्यक्ष केलं त्यांच्या नावात किती कुळे आहेत मला माही नाही, पण ५२ असो वा १५२ कुळे असो शिवसेना कोणीही नष्ट करू शकत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. प्रादेशिक पक्ष संपवून टाकणं म्हणजे संघराज्य पद्धत तुम्हाला नकोय का? असा सवाल करत हम करे सो कायदा ही लोकशाही नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.