भाजपने प्रस्ताव धुडकावला; मुख्यमंत्र्यांनी बोलवली अपक्ष आमदारांची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार चालण्याची शक्यता शिवसेना नेते संजय राऊत यांनी वर्तवली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजप नेत्यांना राज्यसभेच्या जागेसंदर्भात प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने तो धुडकावला. तसेच आम्ही सहज जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर आता अपक्ष आमदार फुटण्याची शक्यता लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 जून रोजी त्यांच्या वर्षा निवासस्थानी अपक्ष आमदारांची बैठक बोलवली आहे.

आज राज्यसभेच्या जागेसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवाराचा अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची वेळ असल्याने महा राज्यसभेच्या निवडणुकीत तोडगा निघावा म्हणून आज सकाळी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपचे नेते, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली तसेच त्यांना प्रस्तावही दिला. मात्र, तो त्यांनी धुडकावून लावला. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उलट राज्यसभेसाठी शिवसेनेने आपला उमेदवार मागे घ्यावा असा प्रतिप्रस्ताव दिला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडून माघार भेटली जाणार नसल्याचे आता आपले अपक्ष आमदार फुटतील या भीतीने उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्व अपक्षांना 6 जून रोजी हजर राहण्याचे सांगितले आहे.

भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडून आमदारांना फोडले जाणार यात काही शंका नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील आमदारांना वर्षावर उपस्थित राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. या ठिकाणी ते आमदारासोबत एक बैठक घेणार असून निवडणुकीबाबत चरचा करणार आहेत.

Leave a Comment