सातारा प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत. यासाठी आज कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर असलेल्या संगमेश्वर मंदिरात शिवसैनिकांनी मंत्रौचार करत महादेवाच्या पिंडीस अभिषेक घातला. यावेळी उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अस साकडं घातले. शिवसैनिकांनी महादेवाला घातलं. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना युती आता तुटल्यात जमा आहे. अशा स्थितीत राज्यात सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हातात असल्याने नवीन समीकरण आता राज्यात पाहायला मिळणार आहेत. शिवसेना राष्ट्रवादीसोबत गेल्यास शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण होत असल्याने. अशा वेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदासाठी महत्वाचे दावेदार मानले जात आहेत. त्यामुळेच कराड मधील शिवसैनिकीप्रमाणे संपूर्ण राज्यातील सेना कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना पाहायचे आहे. असे झाल्यास ठाकरे घराण्यातील पहले मुख्यमंत्री म्ह्णून त्यांची नोंद होणार आहे.