औरंगाबाद प्रतिनिधी | सोशल मीडिया हा जीवनातील एक अविभाज्य घटक बनत चालला आहे.मुलांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, सकाळी मॉर्निंगवॉक पासून ते रात्रीच्या गुडनाईट पर्यंत, सण असो वा मग त्यावेळी केलेली तयारी कपडे आभूषणे पर्यंत आपली सर्व दिनचर्या वयक्तिक माहिती नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र यामुळे हत्या सारखा गंभीर गुन्हा ही घडू शकतो, हो हे खरे आहे. सातारा परिसरात घडलेल्या बहीण-भावाच्या घटनेत असेच काही समोर आले आहे. सोन्याच्या दागिन्यांचा ताट भरून काकूंने ठेवलेला लक्ष्मीपूजनाचा व्हाट्सअप्प स्टेटस पाहून पुतण्यानेच दोन्ही बहीण भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आपली वयक्तिक माहिती सोशलमीडियावर टाकणे किती घातक आहे.याचा प्रत्यय येतो..
सातारा परिसरातील 18 वर्षीय किरण खंदाडे व 16 वर्षीय सौरभ खंदाडे या बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. औरंगाबाद पोलिसांनी दीड दिवसातच या दुहेरी हत्याकांडाची उकल केली असता मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून चुलत भाऊ सतीश खंदाडे-राजपूत आणि मृतांच्या चुलत बहिणीचा नवरा अर्जुन राजपूत निघाला. पोलिसांनी अटक केल्यानंतर तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पैशे आणि सोने मौल्यवान वस्तूची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे घरात लक्ष्मी येते आणि घर समृद्ध होते अशी धारणा आहे. त्यामुळे अनेक घरात होत असलेल्या या पूजे सारखी पूजा मयत सौरभ-किरण यांची आई अनिता लालाचंद खंदाडे-राजपूत यांनी घरात केली होती.या वेळी घरातील सर्व सोन्याचे दाग-दागिने एका मोठ्या ताटात ठेऊन पूजा करण्यात आली.या संपूर्ण पूजनाचे व्हिडिओ आणि फोटो सौ.खंदाडे यांनी त्यांच्या व्हाट्सअप्प या सोशलमीडियाच्या स्टेटसवर ठेवले होते. हाच स्टेटस पुतण्या सतीश ने बघितला आणि त्या नंतर त्याच्या मनात हे सोने चोरी करण्याची मनीषा निर्माण झाली.तो संधी पाहूनच होता.
शेवटी काका-काकू गावी गेल्याची संधी त्याला मिळाली.आणि मेहुणा अर्जुन च्या मदतीने त्याने सोन्याच्या लालसेने दोन जीवाची अति क्रूरतेने हत्या केली. आणि सोने चोरी केले मात्र ते म्हणतात ना पोलीस के हात बहोत लंबे होते है, पोलिसांनी या दोघांना अवघ्या दीड दिवसात जेरबंद केले. लालसेने दोन जीव गेले आणि दोघे आरोपी कोठडीत. एका स्टेटस मुळे हा क्रूर नरसंहार घडला असावा यावर विश्वास बसने थोडे कठीण आहे. या घटनेमुळे सोशलमीडियावर आपण आपली वयक्तिक माहिती टाकणे किती धोकादायक ठरू शकते समोर आले आहे. त्यामुळे सोशलमीडिया वर कोणतीही पोस्ट टाकताना ती विचारपूर्वकच टाकणे योग्य राहील. अन्यथा अशा घटनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फेसबुक, व्हाट्सअप्प, या सारख्या सोशलमीडियावर घरातील वयक्तिक माहिती मौल्यवान वस्तू, रोख रक्कम अशी उघड करू नये. यामूळे नकळत आपली गुप्त माहिती गुन्हेगारा पर्यंत पोहोचू शकते. व या लालसेने चोरी, दरोडे असे गुन्हे घडू शकतात. या पूर्वी अशे अनेक गुन्हे महाराष्ट्रात घडले आहे. पालकांनी देखील आपली मुले घरातील वयक्तिक माहिती सोशल मीडियावर सार्वत्रिक करीत नाहीतना याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा सूचना औरंगाबाद सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता दागवडे यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.