यंदाच्या बजेटमध्ये सरकारने ‘हा’ निर्णय घेतल्यास स्मार्टफोनसह ५० वस्तू होतील महाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । परदेशातून आयात होणाऱ्या सुमारे ५० वस्तूंवर भारत आता जास्तीच आयात शुल्क (Import Duty) आकारणार आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वस्तू, रसायने आणि हस्तकलेसारख्या वस्तूंचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार चीन आणि इतर देशांकडून ५६ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंच्या आयातीवर आयात शुल्क लागू करू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२० च्या अर्थसंकल्पात याची घोषणा करू शकतात. देशातील सध्याच्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता हे पाऊल उचलल्या जाण्याची शक्यता आहे.

या वस्तू महाग होतील
मोबाईल फोन चार्जर, औद्योगिक रसायने, दिवे, लाकडी फर्निचर, मेणबत्त्या, दागिने आणि हैंडक्राफ्ट या वस्तू अधिकचे आयात शुल्क आकारणी केल्यास महाग होऊ शकतात. या प्रकरणाशी संबंधित स्त्रोतांनी ही माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे स्मार्टफोन उत्पादकांना चार्जर, व्हायब्रेटर मोटर्स आणि रिंगरसारखे भाग आयात करणे महाग होईल. केंद्र सरकारने आयडी शुल्क वाढवता येईल अशा वस्तूंची ओळख पटविली आहे ज्यावर आयात शुल्क ५ वरून १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येईल. याचसोबत सरकार गुणवत्तेच्या मानकांवरही विचार करीत आहे.

का, हा निर्णय घेण्यात येणार आहे

सरकारच्या या निर्णयामुळं अनावश्यक वस्तूंच्या आयातीवर आळा बसेल. आयात शुल्कात वाढ केल्याने भारतीय बाजारपेठेतील स्थानिक उत्पादकांना मदत होईल. विशेषत: जेव्हा स्वस्त बाजारपेठेत चिनी उत्पादनांची आयात करण्यास मनाई असेल. एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार सरकार ‘क्वालिटी स्टैंडर्ड्सवर्ण विचार करत आहेत, कारण भारतात आयात केल्या जाणार्‍या सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणीय स्टैंडर्ड्ससाठी १० टक्के दर लावण्याची तरतूद आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये ७५ वस्तूंवर आयात शुल्क आकारण्यात आला होता
अर्थसंकल्पाच्या आधी व्यापार मंत्रालयानेही ब्रँडर अ‍ॅडजस्टमेंट टॅक्स म्हणजेच बीएटी लावण्याची मागणी वित्त मंत्रालयाकडे केली आहे जेणेकरुन स्थानिक उद्योगांना बाजारपेठत समानता मिळेल. स्थानिक उद्योगांना वीज शुल्क, इंधनावरील कर इत्यादी अनेक मार्गांनी कर भरावा लागतो.गेल्या वर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारने जवळपास ७५ वस्तूंवर आयात शुल्क वाढवले ​​होते. यात सोन्याचे, ऑटोमोबाईलचे भाग इत्यादींचा समावेश होता. जुलैमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारने त्यात वाढ केली.

आयात शुल्कामुळे व्यापार तूट कमी झाली
गेल्या अनेक वर्षांपासून निर्यातीच्या तुलनेत भारतातील वस्तूंच्या निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे. परंतु, गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ते ८.९० टक्क्यांनी घसरले आहे. तथापि, या कालावधीत निर्यातीतही दोन टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे एप्रिल ते डिसेंबरदरम्यान होणारी व्यापार तूट कमी करण्यास मोदी सरकारलाही मदत झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१९ दरम्यान एकूण व्यापार तूट ११८ अब्ज डॉलर्स होती जी २०१८ मध्ये १४८ अब्ज डॉलर्स होती.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

फिरा मनसोक्त! खर्च मोदी सरकार देईल; जाणून घ्या काय आहे हा उपक्रम

TATAने केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV कार लाँच; इतकी असणार किंमत

मोठी बातमी : PF खात्यासाठी आता युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आवश्यक, घरबसल्या ‘या’ 7 स्टेपमध्ये काढा UAN