Uorfi Javed: “…तर मी जेलमध्ये जाण्यास तयार”; उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) हे नेहमी आपल्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अडचणीत सापडली आहे. कारण तिच्या या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. उर्फी जावेद हि मुंबईच्या रस्त्यांवर न्युडिटी पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीनंतर उर्फी (Uorfi Javed) चांगलीच भडकली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चित्रा वाघ यांना खुले आव्हान दिले आहे.

चित्रा वाघ यांना उर्फीचं आव्हान
‘मला ट्रायल किंवा हा मूर्खपणाच नकोय. जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत’, अशी पोस्ट लिहीत उर्फीने (Uorfi Javed) चित्रा वाघ यांना खुले आव्हान दिले आहे.

‘प्रसिद्धीसाठी माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार’
उर्फीने (Uorfi Javed) आणखी एका पोस्टद्वारे चित्रा वाघ यांना उत्तर दिले आहे. ‘आणखी एका राजकारण्याने दाखल केलेल्या तक्रारीपासून माझ्या नव्या वर्षाची सुरुवात झाली. कारण या राजकारण्यांकडे खरं कोणतं कामच नाही. हे राजकारणी, वकील मूर्ख आहेत का? संविधानात असा कोणता कलमच नाही, ज्याच्या आधारे मला तुरुंगात पाठवलं जाऊ शकेलं. अश्लीलता आणि न्युडिटीची संकल्पना ही त्या त्या व्यक्तीनुसार बदलते. माझ्या शरीराचा ठराविक भाग दिसत नसेल, तर तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकणार नाही. हे सर्व फक्त मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सुरू आहे’, अशी जोरदार टीका उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?