नवी दिल्ली । संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कष्टकरी वर्ग, कामगारांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी २२ मे रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. यांव्यतिरिक्त या बैठकीसाठी १७ पक्षांनी सहमती दर्शविली आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, सपा आणि बसपाचे नेते उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
‘या’ ३ प्रमुख मुद्द्यांवर होणार बैठकीत चर्चा
कामगार कायदा सुधारणा, स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाले या ३ मुद्दयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपशासित राज्यांकडून कामगार कायद्यात बदल केले जात आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कामगार कायदा आणि स्थलांतरीत मजूर आणि फेरीवाल्यांच्या समस्या या तीन मुद्द्यांवर सोनिया गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे समविचारी पक्षांसोबत चर्चा करणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”