उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

देशभर कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होतो आहे. देशातील अनेक नेते आणि सेलिब्रिटींना देखील कोरोनाने गाठलं आहे. अशातच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला विलगीकरण केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी कोविडची चाचणी केली. आता माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला विलगीकरण केले आहे. आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करत आहे. सर्व कार्य हे व्हार्चूअली करीत आहे’. अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

तसेच पुढे देखील ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की,’ उत्तर प्रदेश सरकारची सर्व कार्य नेहमीप्रमाणे चालू आहेत. या सर्वात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी देखील आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. असे आवाहन देखील योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

देशात कोरोनाचा उद्रेक,1 लाखांहून आधीक नवे बाधित तर 1,027 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. मागील 24 तासात देशभरात 1,84,372नव्या कोरोनाबाधित रुग्नांची नोंद करण्यात आली आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 1,027 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान देशात एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. ही अतिशय चिंतेची बाब ठरली आहे.

दरम्यान मागील 24 तासात 82 हजार 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 38 लाख 73 हजार 825 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात एक कोटी 23 लाख 36 हजार 36 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या देशातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 लाख 65 हजार 704 इतकी आहे. तर कोरोना मुळं देशभरात एकूण एक लाख 72 हजार 85 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तर काही परदेशी लसी देखील आता भारतातल्या व्यक्तींना दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत देशात लसीकरणाने अकरा कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात एकूण अकरा कोटी 11 लाख 79 हजार 578 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

देशात 13 एप्रिल पर्यंत 26 कोटी 6 लाख 18 हजार 166 जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. तर 14 लाख 11 हजार 758 जणांचे नमुने काल मंगळवारी तपासन्यात आले असल्याची माहिती ICMR ने दिली आहे.

 

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group