हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 3 जानेवारी 2022 पासून १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाराला सुरूवात करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच १० जानेवारी पासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरू करणार असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
लसीकरण हे कोरोना लढाईतलं मोठं अस्त्र आहे. भारताने आतापर्यंत 141 कोटी लशीचे डोस दिलेत. घाबरून जाऊ नका, मास्क परिधान करा, नियम पाळा”, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. देशात 61 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे. तर 60 वर्षांपुढील 90 टक्के नागरिकांनी एक लस घेतली आहे.अशी माहिती मोदींनी दिली
देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 लाख 40 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 18 लाख आयसोलेशन बेड्स आहेत. 5 लाख ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड्स आहेत. आयसीयू आणि नॉन आयसीयू मिळून लहान मुलांसाठीही स्वतंत्र बेड्स आहेत. तसेच देशात 3000 हून अधिक ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत”, असं त्यांनी सांगितलं.