लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड
केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले ३ कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.अशी धारणा वंचितची
असून सदर कायदे रद्द करणेत यावेत. या मागणी करिता दिल्ली येथे दीर्घ काळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खंडाळा येथे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणा आंदोलन करण्यात आलेले आहे.
यावेळी हे आंदोलन वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष फारुकभाई पटणी यांच्या नेतृत्वाखाली करण्यासाठी तालुकाध्यक्ष कांतीलाल खुंटे, जहांगीर पटेल, सुरेश जावळे, दीपक भोसले, रणजित खुंटे, प्रल्हाद खुंटे, कृष्णा नरवडे, राहुल चव्हाण, वैशाली गायकवाड, पूजा भोसले, सुनिता गायकवाड, सुनंदा शिंदे, वर्षा गायकवाड, फरीदा पटेल, सुशीला गायकवाड आदी उपस्थित होते. या आंदोलनाला खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश दादा धायगुडे पाटील यांनी सही करीत पाठींबा दर्शविला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देशाचे पंतप्रधान यांना लिहीलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे की, संपूर्ण देशाचा अन्नदाता म्हणून शेतकरी वर्गाला अभिमानाने संबोधले जाते.परंतु केंद्र सरकारने जे ३ कायदे हे शेतकरी वर्गाला उद्धवस्त करणारे आहेत.ही भावना समस्त शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे. तेव्हा तिन्ही कायदे रद्द करावेत अशी मागणी होत आहे. आंदोलन कर्त्यांची मागणी शेतकऱ्यांच्या हिताची असल्यानेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी या मागणीसाठी पाठींबा देण्याचा उद्देशानेच पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’