Vande Bharat Express | सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसचा बोलबाला आहे. प्रवासासाठी अत्यंत आरामदायी आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असलयाने अनेक प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकार सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या मार्गावर नवनवीन वंदे भारत ट्रेन लाँच करत असते. नुकतंच मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली असून यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. त्यातच आता आणखी एक वंदे भारत ट्रेन मराठवाड्याला मिळणार आहे.
मुंबई ते लातूर वंदे भारत ट्रेन – Vande Bharat Express
सध्या भारतामध्ये एकूण 41 वंदे भारत रुळावर धावत आहेत. त्यामुळे ही संख्या वाढवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई ते जालना या मार्गावरील वंदे भारत ट्रेनला 30 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी या दिवशी एकूण 6 वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दिला. त्यामुळे मराठवाड्याला वंदे भारताचा (Vande Bharat Express) अनुभव घेता येणार आहे. त्याचबरोबर येत्या काही महिन्यात अजून काही महत्वाच्या ठिकाणी वंदे भारत सुरु करण्यात येणार असून त्यामध्ये लातूरचाही समावेश आहे. त्यामुळे मराठवाड्याला आता एकूण 2 वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत.
मुंबईला मिळणार 6 वंदे भारत
सध्या महाराष्ट्रात एकूण पाच वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) चालवल्या जात आहेत. त्यामध्ये मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर गाडी चालवली जात असून 2024 मध्ये मुंबई ते लातूर ही गाडी सुरु झाल्यानंतर मुंबईतील वंदे भारतची संख्या ही 6 वर पोहचणार आहे. तसेच वंदे भारतला मराठवड्यातही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.