वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आता या कोरोनात शाळा बंद राहणार कि सुरु राहणार? असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठे विधान केले आहे. “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पुन्हा एका चिंतेचा विषय बनली आहे. कोरोना रुग्णवाढीमुळे चिंता वाढली आहे. पण काळजी घेऊन शाळा सुरु ठेवू,” असे गायकवाड यांनी म्हंटले आहे.

मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, 15 जूनपासून शाळा सुरु होणार आहे. शाळांसाठी एसओपी जारी करण्यात येईल. शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसात घेण्यात येईल. तसेच शिक्षण विभाग शाळांकरता नवी कोविड नियमावली जारी करणार आहे. कोरोनामुळे शाळा दीर्घ काळ बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झाले आहे.

विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याकरता अवघे काही दिवस राहिले आहेत. या दिवसात शाळा सुरु करण्याची तयारी सध्या शिक्षण विभागाकडून केली जात आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या देशभरात वाढत आहे. राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळांबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment