चेन्नई : वृत्तसंस्था – तमिळनाडूतील चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 19 वर्षीय विद्यार्थ्याचा फास्ट ट्रेनमधून पडल्याने दुर्देवी मृत्यू (Accident) झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा तरुण विद्यार्थी ट्रेनमध्ये मित्रांसोबत मिळून स्टंट करीत होता. त्यादरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेनमधून खाली (Accident) पडला. त्या मुलाचे नाव नीती देवन असे असून तो तिरुविलंगाडू या ठिकाणचा रहिवाशी होता. तसेच तो जो प्रेसीडेन्सी कॉलेजमध्ये बीए अर्थशास्त्राचं शिक्षण घेत होता.
फास्ट ट्रेनमधून स्टंट करताना पाय घसरून विद्यार्थ्याचा दुर्देवी अंत pic.twitter.com/IHfRMcA9cA
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 30, 2022
अपघातापूर्वी मृत नीती देवन याने स्टंटचा एक व्हिडीओ तयार केला होता. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो मित्रांसह मिळून ट्रेनमध्ये स्टंट करताना दिसत आहे. ट्रेनच्या खिडकीबाहेर लटकून सर्व मित्र मस्ती करीत होते. तेव्हा देवनचा पाय घसरला (Accident) आणि तो फास्ट ट्रेनमधून खाली पडला. यानंतर गंभीर जखमी (Accident) झालेल्या देवनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. वारंवार रेल्वेकडून धोकादायक स्टंट करू नये असं सांगण्यात येत असतानादेखील मुले असा स्टंट करतात आणि आपला जीव गमावून बसतात.
हे पण वाचा :
दोन महिलांनी चोरल्या 90 हजारांच्या पैठण्या, चोरीची घटना CCTVमध्ये कैद
मृत पिल्लाला घेऊन हत्तीणीची फरफट, मन हेलावणारा व्हिडिओ आला समोर
कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात
नागपुरची कन्या संजना जोशी राष्ट्रकुल स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्त्व, कोण आहे संजना जोशी ?
जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे