मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीतून भाजपात आलेले मोहिते पाटील घराणे माढा मतदारसंघात विजयी मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर भाजप त्यांच्या कामाची दखल घेणार असल्याचे दिसते आहे. मात्र मागील काही दिवसापासून विजयसिंहांना कॅबेनेत मंत्री पद दिले जाण्याची चर्चा होती. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यपाल बनवण्यात येईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अजित पवारांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भाषणात एकाच सभेत इव्हिएमवरून विसंगती
विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्याच्या मंत्री मंडळात दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाच्या जोरावर त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ठ करून घेतले जाईल असे बोलले जात होते. मात्र त्यांना त्यांच्या जेष्ठतेला साजेसे पद देऊन सन्मानित करण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केलं आहे. येत्या काही दिवसात हिंदी भाषिक राज्यातील ३ आणि दक्षिणेतील २ राज्यातील राज्यपाल पदे रिक्त होणार आहेत. त्या जागी विजयसिंह मोहिते पाटील यांची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे.
इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंवर केली जहरी टीका
दरम्यान येत्या दोन दिवसात राज्य मंत्री मंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तसेच या विस्तारात भाजपचे सरचिटणीस संजय कुटे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे. तर मराठवाड्यातून प्रशांत बंब अथवा अतुल सावे यापैकी एका भाजपच्या आमदारांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाणार आहे. तर दीपक सावंत यांचे विधान परिषदेतील सदस्यत्व संपुष्ठात आल्याने रिक्त झालेल्या मंत्री पदावर जयदत्त क्षीरसागर जागी शपथ घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदर भाजपचे ४ आणि शिवसेनेचे २ असे सहा मंत्री नव्याने मंत्री मंडळात समाविष्ट केले जाणार आहेत.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2EDyi7e
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या ‘या’ मतदारसंघात होत आहे नव्या उमेदवाराची मागणी
तासगाव विधानसभेला ‘या’ नेत्याला निवडून देण्याचे खा. संजय पाटील यांनी केले आवाहन
भाजपच्या कार्यकर्त्याचा सांगलीत खून
पवारांनी RSS चे कौतुक केल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….
अमोल कोल्हेंनी केली राज्य सरकारवर सडकून टीका
शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक