शरद पवारांनी काँग्रेसमध्ये यावे ही बाळासाहेबांची भूमिका योग्यच- विजय वडेट्टीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे खुले आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही थोरातांच्या सुरात सूर मिसळत बाळासाहेबांचे मत योग्यच असल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे. आमचे नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका योग्यच आहे. आपसात काही मतभेद हे असतातच. किंवा मग टोकाची भूमिका घेण्यापेक्षा किंवा टीका करण्यापेक्षा आपली विचारधारा एकच असल्याने शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये यावे आणि पक्षाची शक्ती वाढवावी, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे.

बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले-

काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेसचे विचार पुरोगामी विचार आहेत. आपण एका विचाराचे आहोत. पवारांनी टीका-टीप्पणी करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवं. युपीए म्हणून एकत्र होतो आणि सहकारी म्हणूनही एकत्र होतो. युपीएचा कारभार चांगला होता, असे बाळासाहेब थोरात म्हणाले