हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याच्या या पत्रकार परिषदेतील टिकेवरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. “स्वत: नॉन मॅट्रिकी आहात. अशा नॉन मॅट्रिक असलेल्या माणसाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असंस्कृत म्हणणे यासारखा दुसरा विनाद नाही, असे म्हणत राऊतांनी राणेंना टोला लगावला आहे.
विनायक राऊत यांनी नुकताच रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री नारायण राणे याच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मध्यन्तरी राणेंनी एक पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. एखाद्या नॉन मेट्रिक माणसाने मुख्यमंत्र्यांना असंस्कृत म्हणणे यासारखा दुसरा विनोद नाही, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी राऊत यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, फडणवीसांनी महा विकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली असे म्हंटले आहे. त्यांनी अगोदर तपासून घ्यावे कि ओबीसी आरक्षणाची हत्या कुणी केली ते. मध्य प्रदेशमध्ये दोन दिवस आधी आरक्षण नाकारले जाते. आणि दोन दिवसानंतर पुन्हा आरक्षण दिले जाते हे न उलगडणारे कोडे आहे. महाराष्ट्राने नेमके काय पाप केले आहे. म्हणीन ओबीसींना आरक्षण मिळू शकत नाही. महाराष्ट्र सरकार ओबीसींना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही राऊत याणी म्हंटले.
काय केली होती नारायण राणेंनी टीका?
काही दिवसापूर्वी मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यावेळी ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरे हे असंस्कृत सीएम आहेत. ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते. मुख्यमंत्र्यांनी जाहिरातबाजी करुन सभा घेतली. 300 रुपये देऊन बीकेसीतील सभेला लोक जमा केले. घड्याळ लावून मी ठाकरेंची सभा पाहिली, फक्त 50 मिनिते ही सभा चालली. उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण हे बोगस भाषण होते, अशी टीका राणेंनी केली होती.