“महाविकास आघाडीच्या मुळावर उठणाऱ्यांच्या चिंधड्या उडतील” : विनायक राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या साहाय्याने मंत्र्यांवर कारवाई केली जात असल्याने या विरोधात आज शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार घेऊन महत्वाचा गौप्यस्फोट करणार आहेत. या पार्श्व्भूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील बॉंबस्फोटानंतर महाविकास आघाडीच्या मुळावर उठणाऱ्यांच्या चिंधड्या उडतील, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडी सरकारच्या मुळावर जे लोक उठले आहेत. त्या लोकांच्या विरोधात संजय राऊत यांनी पुरावे गोळा केले आहेत. तसेच गोळा केलेली सर्व माहिती त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयाला देखील दिली आहे. आणि त्याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे संजय राऊत याचा आजच्या पत्रकार परिषदेतील बॉम्बस्फोट हा जबरदस्त असेल. आणि महाविकास आघाडी सरकारच्या मुळावर येणाऱ्यांच्या नक्कीच चिंधड्या उडल्याशिवाय राहणार नाहीत.

ईडी तसेच केंद्रीय तपास यांचत्रणेकडून महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्याचे काम जे होत आहे. त्यांना तोंड देण्याचे काम संजय राऊत ज्या पद्धतीने करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण भक्कमपणे उभे आहोत, अशी राऊत यांनी म्हंटले.

Leave a Comment