हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्वी जे घडले ते अगदी त्याच मार्गाने ते पुन्हा घडले तर त्याला देजा वू असे म्हणतात. असेच एक देजावू ऑस्ट्रेलियन वन्यजीव संरक्षक स्टीव्ह इरविन यांचा 16 वर्षीय मुलगा रॉबर्ट इरविनसोबतही घडले आहे. रॉबर्टने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका सापाने त्याच्यावर अगदी तसाच हल्ला केला जसा 14 वर्षांपूर्वी एका शो दरम्यान त्याच्या वडिलांवर केलेला होता. 2006 मध्ये एका शूटिंगदरम्यान स्टिंग्रे या माशाच्या प्राणघातक हल्ल्यात स्टीव्हचा मृत्यू झाला होता.
रॉबर्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो अजगर विषयी माहिती देताना दिसत आहे पण यावेळी हा अजगर साप त्याच्या चेहऱ्यावर चावतो. तथापि, अजगर हे विषारी नाहीत, म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मात्र, अशीच एक घटना सुमारे 14 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांसोबत घडली होती. त्या काळात रॉबर्टचे वडील स्टीव्ह हे एका कार्यक्रमासाठी शूट करत होते, त्यावेळी त्यांच्या हातात अजगर होता, तो मागे वळून त्याच्या चेहऱ्यावर चावला. रॉबर्टने या घटनेचाही व्हिडिओ शेअर केला आहे.
रॉबर्ट लहानपणापासूनच त्याच्या वडिलांच्या मार्गावर चालत आहे
वडिलांच्या देखरेखीखाली रॉबर्टही वयाच्या केवळ 6व्य वर्षापासूनच वन्यजीव संरक्षक आणि प्राणी बचावकर्ता म्हणून कार्यरत आहे. त्याने अनेक प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये भाग देखील घेतलेला आहे आणि या माध्यमातून तो वन्य प्राण्यांविषयी जागरूकता पसरवितो. अजगराने त्याला चावलेल्या या व्हिडिओत तो सापांविषयीच्या गैरसमजांची माहितीही देत होता.
रॉबर्टचा असा विश्वास आहे की सापांबद्दल पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे लोक त्यांना घाबरतात आणि बहुतेक वेळा ते विषारी आहेत की नाही हे जाणून न घेता त्यांना ठार मारतात. रॉबर्टचा हा व्हिडिओ बर्याच लाखो लोकांनी पाहिला आहे आणि जसे वडील तास मुलगा अशाप्रकारच्या काही कमेंटही त्यावर आलेल्या आहेत. यापूर्वीही रॉबर्टचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, लोक त्याला त्याच्या वडिलांसारखच दिसत असल्याचे कमेंट करत होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.




