तुम्ही खरंच रोहितला T 20 मधून ड्रॉप केलं असत का?? विराटकडून पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. पाकिस्तानने भारताचा तब्बल 10 गडी राखून पराभव केला. भारताची फलंदाजी गडगडल्याने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराणे उपकर्णधार रोहित शर्मा बद्दल खोचक प्रश्न विचारत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला असता विराट कोहलीनेच त्या पत्रकाराची शाळा घेतली.

काय होता पत्रकाराचा प्रश्न-

सराव सामन्यात इशान किशन यानं चांगली कामगिरी केली. त्यामुळे जर आज इशान किशन खेळला असता तर त्यानं रोहित शर्मापेक्षा चांगली कामगिरी केली असती, असे तुला वाटत नाही का? असा प्रश्न पत्रकाराने विराटला विचारला.

विराट नेमकं काय म्हणाला-

हा खूप धाडसी प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते सर? मी सर्वोत्तम संघ घेऊनच मैदानावर उतरलो, तुमचं मत काय?, तुम्ही खरंच ट्वेंटी-२० सामन्यातून रोहित शर्माला ड्रॉप केलं असतं?, ज्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. ( डोक्यावर हात मारून) सर तुम्हाला काँट्रोव्हर्सी हवी आहे, तर मला आधीच सांगा, मी त्यानुसार उत्तर देईन असे कोहली म्हणाला

Leave a Comment