सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून उमेदवारांना मतदानानंतर थोडी उसंत मिळाली आहे. निवडणूक काळात व्यस्त असणारे नेते आता कार्यकर्त्यांना वेळ देताना दिसत आहेत. कोणी कार्यकर्त्यांच्या लग्नाला तर कोणी अन्य शुभकार्याला हजेरी लावताना दिसत आहे. आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया मध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विशाल पाटील यांनी चक्क एका कार्यकर्त्याच्या लग्नात झिंगाट गाण्याच्या तालावर ठेका धरत भन्नाट डान्स केला आहे.
हा व्हिडीओ वॉट्सअपवर व्हायरल होत आहे. पलूस तालुक्यातील नागराळे येथे राहणारे माजी आमदार संपतराव चव्हाण यांचे नातू आणि माजी सरपंच हणमंतराव चव्हाण यांचे पुतणे दौलतराव चव्हाण यांचा काल कुंडल येथे लग्न समारंभ संपन्न झाला. या लग्न सोहळ्याला लोकसभेचे उमेदवार आणि युवा नेते विशाल पाटील यांनी हि हजेरी लावली. विशाल पाटील यांना विवाह स्थळी पोहोचण्यात थोडा उशीर झाला. त्यावेळी नवऱ्या मुलाची वरात सुरु होती. विशाल पाटील यांची गाडी थेट वरती समोर थांबली आणि त्यावेळी बँडवर मराठीतील सुप्रसिद्ध चित्रपट सैराट मधील झिंगाट गाणे वाजत होते. मग काय विशाल पाटील हे गाडीतून उतरताच कार्यकर्त्यांनी त्यांना वरातीमध्ये नाचण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांचा आग्रह पाहून विशाल पाटील यांनीही कसलाही संकोच न बाळगता झिंगाट गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत भन्नाट डान्स केला.
विशाल पाटील यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ आज सोशल मोडियावर चांगलाच व्हायरल झाला. लोकसभा निवडणुकीच्या तणावातून विश्रांती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या रंगात विशाल पाटील हे आज रंगताना दिसले. राजकारणातील ताणतणाव विसरून खुले आयुष्य एकदातरी सर्व नेत्यांनी जगलं पाहिजे हेच यातून स्पष्ट होते
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..
अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर
नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”
राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा
या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट
मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर