वाधवान कुटुंबाला पकडून ठेवा, सीबीआयची सातारा प्रशासनाला सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान कुटुंब लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रवासात त्यांना कोणीही अडवलं नाही. कारण राज्याचे गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला आलिशान गाडीतून प्रवास केला. या पत्रात गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाचा उल्लेख ‘फॅमिली फ्रेंड’ असा केल्याने एकच खळबळ माजली होती. काल दिवसभर माध्यमांत या एकाच प्रकरणाची चर्चा होती. या चर्चेमुळे जिल्हा प्रशासनावर वेगळाच दबाव होता. गुरुवारी रात्री उशिरा उद्योगपती वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या धक्कादायक प्रकारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आता, सीबीआयचं पथक त्यांची कोठडी घेण्यासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु सध्या तरी सीबीआयच्या पथकाला तिथे पाठवलेलं नाही. मात्र सीबीआयने साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून वाधवान बंधुंवरील गुन्ह्यांची आणि अजामीनपात्र वॉरंटची माहिती दिली. तसंच कुठेही जाण्यापूर्वी किंवा कोणतीही कारवाई करण्यापूर्वी वाधवान कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असल्याचंही सीबीआयने सांगितलं. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका सीबीआयला असल्याने हा निर्णय घेतला आहे. सीबीआय चौदा दिवसांच्या आत त्यांना कसं आणि कधी अटक करायची यासंदर्भात निर्णय घेणार आहे.

दरम्यान, वाधवान बंधुंचा क्वॉरन्टाईनचा काळ संपल्यानंतर त्यांचा ताबा केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तसंच गरज भासल्यास सर्व आरोपींना विशेष विमानाने पाठवण्याची सोय करा असंही गृहमंत्रालय राज्य सरकारला सांगू शकतं. कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी HDIL, फायनान्स कंपनी DHFL सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु DHFL आणि YES बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –