कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सुशिक्षित बेरोजगारांना सरकार अनेक योजना घेवून येत आहे, मात्र राष्ट्रीयकृत बँका या सुशिक्षित बेरोजगार असणार्यांची हेळसांड करत असून कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहे. राष्ट्रीयकृत बँकाच्या या चुकीच्या भूमिकेविरोधात यापुढे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेकडून टाळे ठोकण्यात येणार असल्याचे संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी इशारा दिला आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद चव्हाण, क्रांती मोरे, सचिन भिसे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. इम्रान मुल्ला म्हणाले, सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी सरकार योजना आणून बेरोजगारांची समस्य दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बँकाबरोबर योजनाचा कर्जपुरठा करण्यात येतो. या योजनातून काहीजण कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र बँकेच्या जाचक व मनमानी कारभारामुळे त्याच्या पदरी निराशा पडत असल्याचे दिसून येत आहे.
सदरील बाबीबाबत संघटनेचे अध्यक्ष महारूद्र तिकुंडे यांच्या आदेशाने बेरोजगार यांना होणार्या त्रासाबाबत लेखी तक्रार करण्याचे आवाहन करत आहोत. बेरोजगारांना कर्जपुरवठा न करणार्या बँकाच्याबाबत संघटना आवाज उठवणार असून त्यांना टाळे ठोकण्यात येणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”