Stock market today: बाजार विक्रमी पातळीवर बंद, Sensex 51340 अंकांनी तर nifty मध्येही झाली मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सोमवारी बाजारात चांगली वाढ दिसून आली. सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टी (NSE nifty) या दोन्ही निर्देशांकाने आज नवीन विक्रम नोंदविला. सेसेन्क्स 618 अंक म्हणजेच 1.22 टक्क्यांच्या वाढीसह 51,348.77 च्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 192 अंकांच्या म्हणजेच 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 15115.80 पातळीवर बंद झाला आहे. याखेरीज बँक निफ्टी सलग आठव्या दिवशी जोरदारपणे बंद झाला आहे. निफ्टी बँक 35,980 वर पोहोचण्यात यशस्वी झाली आहे.

आज ऑटो, मेटल आणि आयटी शेअर्स मध्ये चांगली खरेदी दिसून आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्हर आज टॉप गेनर्स आहेत. दुसरीकडे, एचयूएल आणि कोटक बँक आजच्या टॉप लूजर्स आहेत.

घसरण झालेले शेअर्स
घसरण झालेल्या शेअर्सविषयी बोलताना, आज सेन्सेक्सच्या 30 पैकी 24 शेअर्स तेजीत बंद झाले आहेत. या व्यतिरिक्त 6 शेअर्स विक्री दिसून आली आहे. आज, एचयूएलचा समावेश 1.43 टक्क्यांनी घसरलेल्या टॉप लूजर्सच्या लिस्टमध्ये झाला आहे. या व्यतिरिक्त कोटक बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, बजाज ऑटो आणि सन फार्मा जोरदार विक्रीसह बंद झाले आहेत.

तेजी आलेले शेअर्स
या व्यतिरिक्त 7.23 टक्के वाढीसह M&M चा समावेश टॉप गेनर्सच्या लिस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच बजाज फायनान्स, भारती एअरटेल, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एलटी, ओएनजीसी, एनटीपीसी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टीसीएस, टेक महिंद्रा, अ‍ॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, रिलायन्स या सर्व कंपन्यां ग्रीन मार्क्स वर बंद झाल्या आहेत.

सेक्टरल इंडेक्स वाढला
सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलताना, आज बीएसई एफएमसीजीमध्ये विक्रीचे वर्चस्व राहिले आहे. या व्यतिरिक्त सर्वच क्षेत्रांत चांगली खरेदी झाली आहे. दिवसभराच्या व्यापारानंतर सोमवारी बीएसई ऑटो, कॅपिटल गुड्स, बँक निफ्टी, कंझ्युमर ड्यूरेबल्स, पीएसयू, ऑईल अँड गॅस, पीएसयू, मेटल्स, हेल्थकेअर या सर्व कंपन्यांची चांगली खरेदी झाली.

स्मॉलकॅप-मिडकॅप स्टॉक
>> बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 292.65 अंकांच्या वाढीसह 19388.71 च्या पातळीवर बंद झाला.
>> बीएसई मिडकॅप इंडेक्स 292.13 अंकांच्या वाढीसह 19705.30 च्या पातळीवर बंद झाला.
>> सीएनएक्स मिडकॅप इंडेक्स 339.10 अंकांच्या वाढीसह 22765.00 च्या पातळीवर बंद झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

 

Leave a Comment