हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे देश जागेवर थांबला. उद्योग, व्यवसाय ठप्प आहे. याबरोबरच शिक्षण क्षेत्रावर देखील याचे दूरगामी परिणाम होताना दिसताहेत. अनेक परिक्षा रद्द झाल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने जूनमध्ये शाळा सुरु होणार नसल्याचे दिसत आहे. आता ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे येवू लागलाय. हे शक्य होईल का? काय आहे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहुयात स्पेशल रिपोर्ट
शाळेच्या मैदानात बागडणारी मुलं ही त्या शाळेचे वैभव असते. शाळेत सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, साहित्य, वैज्ञानिक यासह अनेक विषयांचे धडे मिळतात. विद्यार्थी खेळतो, नाचतो, खोड्या करत मोठा होतो. “छडी लागे छम छम , विद्या येई घम घम” या वाक्याप्रमाणे अभ्यास केला नाही अथवा काय खोडी केली तर शिक्षक मारतात हे माहिती असताना छडीचा मार खावून देखिल तो आवडीने न चुकता शाळेत जातो. त्यामुळे काहीही झाले तर शाळा सुरुच व्हाव्यात अशी मागणी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व्यक्त करताहेत.
मात्र शहरी भागात हे शक्य असले तरी ग्रामीण भागात हे स्विकारले जाणार का ? अशी यंत्रणा ग्रामीण भागात आहे का? यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. शाळेत ४० ते ६० विद्यार्थ्यांवर एक शिक्षक काय स्वरूपात लक्ष देण्यासाठी असतात. ग्रामीण भागात आई-वडील कामानिमित्त बाहेर जाणार. मग घरी एकटा विद्यार्थी अभ्यास करु शकणार नाही असे पालकांना वाटत आहे. तर शिक्षणाचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन टप्प्यात विभागणी करुन ऑनलाईन शिक्षणाचा विचार व्हावा.असे मत काही शिक्षण तज्ञ मांडताहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.