नवी दिल्ली । जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाच्या लढाईत पुढे आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. बंदरं सुरु झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलं जातं आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरंच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ तसंच करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढतो आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
सध्या देशभरात प्रश्न आ वासून उभा आहे तो कामगारांचा. त्यांची काळजी सामाजिक संस्था घेत आहेत. राज्य सरकारंही काळजी घेत आहेत असंही गडकरी यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडावी अशी मागणी केली होती. त्याबाबत विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी मला सध्याच्या परिस्थितीत काही ठीक वाटत नाही. स्थलांतरित मजुरांसाठी सध्याच्या गंभीर परिस्थितीत विशेष ट्रेन सुरु तर केल्या सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार नाही. स्टेशनवर एकच गर्दी होण्याची शक्यता होईल आणि त्यातून कोरोनाचा संसर्ग होणाच्या धोका आहे. वांद्रे स्टेशनवर काय घडलं होत हे आपल्या सर्वांसमोर आहे” असं गडकरी यांनी सांगितलं.
याचसोबत हे सर्व मजूर गेले तर काम काय करणार? तिथे त्यांचं घर असेल त्यामुळे राहण्याचा प्रश्न येणार नाही. मात्र रोजचं पोट कसं भरणार? त्यामुळे या मजुरांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे ” असंही मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. भारतात विकासाचं चक्र पुन्हा गती घेईल असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आम्ही सगळे मिळून आर्थिक संकटही परतवून लावू असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.