हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत केलेल्या ट्विटमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार असा दावा त्यांनी केल्यानंतर चर्चाना उधाण आलं. त्यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांना खुलीं ऑफर दिली आहे. अजित पवार आरपीआयमध्ये आल्यास आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू असं त्याची म्हंटल आहे.
प्रसामाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार हे काम करीत आहेत. शरद पवार यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अनेक पदे देऊन अनेक वेळा न्याय देण्याचे काम केले आहे. आता अजित पवार भाजपसोबत जाणारा अशा बातम्या येत आहेत. पण मला वाटत नाही कि ते भाजपसोबत जातील. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चांगली मैत्री असून त्या दोघांनी यापूर्वी एकत्रित शपथ घेतली होती . त्यामुळे राजकारणात काहीही अशक्य नाही. अजित पवार नाराज आहेत कि नाही हे मला माहित नाही. पण काय निर्णय घ्यायचा असेल तर तो अधिकार त्याना आहे.
अजित पवार माझ्या पक्षात आले तर मला आनंदच आहे. ते सक्षम नेते आहेत. मराठा समाजाचे नेते आहेत. अनेक वर्ष ते पवार साहेबांच्या जवळ राहिलेले आहेत. त्यामुळे ते आरपीआयमध्ये आले तर आनंदच होईल. भविष्यात कधी आम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देऊ असेही आठवले म्हणाले, त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.