परीक्षा रद्द पण बॅकलाॅग राहिलेल्यांचे काय? 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय हा प्रश्न आता मिटला आहे. त्याबाबत परीक्षा रद्द केल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि मागील परीक्षांमधील गुंणानुसार श्रेणी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेत विषय राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न अद्याप शासनाने सोडविला नाही. यांचे गुणांकन कसे होणार? किंवा याना परीक्षा द्याव्या लागणार का? आणि जर द्याव्या लागल्या तर कधी असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आहेत.

राज्यात सुमारे ९ लाख विद्यार्थी अंतिम वर्षात होते. त्यातील साडेतीन लाख म्हणजे जवळपास ४५% विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत. पुणे विद्यापीठातील ७५ हजार म्हणजे सुमारे ३०% विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत. आता या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणार की त्यांना आता जेव्हा परीक्षा होतील तेव्हापर्यंत वाट बघावी लागणार असा प्रश्न उभा ठाकला आहे. या विदयार्थ्यांच्या बाबतीत शासन काय निर्णय घेते याकडे आता बहुतांश विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

जर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर राहिलेला विषय सुटल्याशिवाय या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होता येणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत त्या विद्यार्थ्यांचे काय याबाबत स्पष्टता देण्याबाबत मागणी केली आहे. आता शासन काय निर्णय घेते यावर या विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.