हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत जगभरातील १९ लाखाहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, तर १ लाख २० हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही संक्रमित रुग्णांची संख्या वाढून १० हजारांच्या पुढे गेली आहे. चीन येथून हा घातक कोरोना विषाणू कसा पसरला याचा खुलासा अद्यापही करण्यात आलेला नाही आहे, परंतु भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या अहवालाने याबाबतचा खुलासा केला आहे.
आयसीएमआरच्या अहवालानुसार, सार्स-सीओव्ही -२ विषाणू भारतातील दोन जातींच्या वटवाघुळांमध्ये सापडला आहे. आयसीएमआरने वेगवेगळ्या राज्यातून घेतलेल्या नमुन्यांच्या आधारे याची पुष्टी केली आहे.आयसीएमआरने यासाठी सात राज्यातील नमुने घेतले. या राज्यांपैकी केरळ, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी आणि तामिळनाडू यासह अनेक राज्ये ही या चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.
खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक#coronavirus #coronaupdatesindia #HelloMaharashtrahttps://t.co/AmNrAG3QGs
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
प्रसूतीच्या वेळी आईपासून मुलाला संसर्ग होऊ शकतो.आधी आयसीएमआरने असे सांगितले होते की प्रसूती दरम्यान आईकडून तिच्या बाळाला कोरोनाचे संक्रमण होणे शक्य आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सोमवारी सांगितले की कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे, केवळ गर्भधारणेदरम्यानच आईपासून ते मुलाला संसर्ग होण्याची शक्यता नसून प्रसूतीच्या वेळीही आईपासून मुलाला हा संसर्ग होऊ शकतो.
आयसीएमआरने मात्र हे स्पष्ट केले की अद्याप गर्भ आणि नवजात मुलामध्ये संसर्गाचे प्रमाण निश्चित झालेले नाही आहे. कौन्सिलने म्हटले आहे की, अद्यापपर्यंत आईच्या दुधामध्ये कोरोनाच्या संसर्गाबाबत दुजोरा मिळालेला नाही. तसेच, अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे जी कीं या व्हायरसमुळे गर्भपात किंवा अकाली प्रसव होण्याच्या जोखमीची पुष्टी करेल.
कोरोना संकटाच्या वेळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आयसीएमआर म्हणाले की, आईपासून नवजात मुलास विषाणूचे संक्रमण शक्य आहे. किती गर्भाशयांना याचा परिणाम झाला आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद
चिंताजनक! राज्यात दिवसभरात ३५० नवे कोरोनाग्रस्त, एकुण आकडा २६८४ वर
लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा
पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव
भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…