हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे राज्यातही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्र सरकार आमनेसामने आले आहे. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मनसुख मांडविया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता काँग्रेसने (Maharashtra Congress) भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. “दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?” असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ‘ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत’ असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?” असं आपल्या ट्विटमध्ये म्हणत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. तसेच “दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?” असं म्हणत एक फोटो ट्विट केला आहे.
ऑक्सीजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता 'ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत' असं उत्तर देण्यात येतं, रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं.
दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे? pic.twitter.com/F3y1bqRi1d— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 17, 2021
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आणि संजय धोत्रे या नेत्यांवर महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेमडेसिविर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धतादेखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांना ताबडतोब रेमडेसिविरच्या कुपी पुरवल्या जाव्यात, अशी मागणी नवाब मलिक केली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाने वेळोवेळी केंद्र सरकारला सूचना केल्या. मात्र त्या सूचनांची टिंगल करण्याव्यतिरिक्त केंद्राने काही केलं नाही. जर वेळीच त्या सूचना गांभीर्याने घेतल्या असत्या तर आज लोकांना हकनाक आपले जीव गमवावे लागले नसते: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले pic.twitter.com/xtQLd1Yllv
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 17, 2021