Work From Home करता करता थोडं Work For Village केलं अन् आज ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे, नवीन पिढीने राजकारणात सहभाग घ्यायला पाहिजे, तरुण हेच देशाचे भविष्य भवितव्य ठरवतील, अशा प्रकारचे वाक्य चौकाचौकात ऐकायला मिळतात. पण प्रत्यक्षात तरुणांचा सहभाग फार कमी पाहायला मिळतो. पण अशाच पिढी नी पार राजकारणामध्ये गावचे ‘ कोरस् गावचे उदाहरण हे एक वेगळेपण ठरवत आहे. या गावातील तरुणांनी पिढी नी पार चाललेल्या राजकारणाला बगल देत आपल्या कल्पना आणि निश्चय यावर गावची सत्ता खेचून आणली. या ठिकाणी सत्ता ‘ म्हणणे योग्य ठरणार नाही कारण ते याला जवाबदारी’ समजतात. अशाच तरूनाबद्दल आणि त्याच्या गाव बदलण्याच्या धेयवेड्या निश्चायाबद्दल जाणून घेणार आहोत. हा तरुण आहे खोरस, तालुका पालम, जिल्हा परभणी या गावचे सुपुत्र मदनेश्वर सुरनार!

पुण्यात MPSC करून जगाचा अभ्यास झालेले तरुण. गावाला नक्की कशाची गरज आहे हे अचूक माहिती असलेले. आपल्या गावच्या प्रगतीमध्ये कशाचा अडथळा आहे हे नक्की माहिती असलेले तरुण गावचा विकास करण्याचे ठरवतात आणि त्या दृष्टिकोनातून पावले उचलणे सुरू होते. आपल्या सारख्या विचार सरणीचे लोक जोडत आणि समोरच्याला आपली विचार सरणी पटवून देत, सर्वांना आपलेसे करून सोडणारे हे तरुण गावातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात रस दाखवू लागले. गावकऱ्यांना सुद्धा हे नवीन होते. आजपर्यंत कोणी जात, भावकी, नाते, गट, तट आणि लागेबंध सोडता कोणी मत मागत नव्हते. आणि काय करायचे? हा प्रश्न विचारता फक्त ‘विकास करायचा’ हे ठोकताळे उत्तर ऐकून लोकही कंटाळले होते. त्याच ठिकाणी विकास म्हणजे नक्की काय! याची मुद्देसूद मांडणी करणारा जाहीरनामा या मुलांनी लोकांसमोर ठेवला. लोकांना सुद्धा यामध्ये रस येऊ लागला. हळूहळू विश्वास ठेवून पाहण्यावर बोलले जाऊ लागले आणि यातूनच या तरुणाची बिनविरोध सरपंचपदी निवडणूक झाली. पण मध्यंतरी गटा तटाचे राजकारणाने परत निवडणुका लागल्या आणि या तरुणांनी आपले पॅनल उभा करून निवडणूक लढवली आणि बहुमताने ती जिंकली सुद्धा!

पॅनल कसे निवडले:
पॅनल खूप विचार करून निवडले गेले. यामध्ये हे तरुण आणि सोबत इतर जण त्यामध्ये, 3 महिला आणि 6 पुरुष असे एकूण 9 लोकांचे पॅनल निवडण्यात आले. यामधे एक पुरुष जो गावाला खूप वर्षांपासून मोफत पाणी देत होता, एक महिला, जी महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवत होती, दुसरी महिला, जी गावच्या इतर महिलांचा ग्रुप बनवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत होती. तिसरी महिला, जीने आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह घरच्यांच्या मर्जी विरूध्द जाऊन रोखला होता. पाचवा मेंबर हा तहसील कार्यालयात कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या घरचा व्यक्ती निवडला जेणेकरून तहसील कार्यालयातील काहीही शासकीय कामे अडणार नाहीत. असे पॅनल निवडल्यामुळे एक विश्वासार्हता निर्माण झाली आणि लोकांनीही भरघोस प्रतिसाद देत निवडून आणले.

'या' तरुण पत्रकाराने गावच्या मातब्बर पुढार्‍यांना धूळ चारत ग्रा.पं. मध्ये एकहाती सत्ता आणली

गावासाठी पुढील पंचवार्षिकचे नियोजन व उद्दिष्टे :

पुढील पाच वर्षासाठी गावच्या विकासाचा आराखडा तयार असून पाहिले अडीच वर्ष मूलभूत सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यामध्ये पिण्याचे पाणी, शिक्षण, अंगणवाडी, सौचालय, स्वच्छता यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यासोबत महिला शिक्षण, महिला संरक्षण, नवीन बालकांसाठी चांगली शाळा रोजगार यावर काम करायचे आहे. गावचा विकास येणाऱ्या पिढीला उपयोगी ठरेल असा करायचा असून त्यातून एक सकारात्मक संदेश द्यायचा आहे.

अश्या या ध्येयवेड्या मदनेश्र्वर सुरनार आणि तरूणांना त्यांनी निवडलेल्या या चंगल्या कामासाठी ‘हॅलो महाराष्ट्र’ वृत्त समूहाकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment