WHO ने जाहीर केले मास्क घालण्याचे नवे निर्देश; ‘हे’ तुम्हाला माहिती असणे महत्वाचे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने आता मास्क घालण्या संदर्भात काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. ग्लोबल हेल्थ एजन्सीच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी लोकांनी मास्क घालावे. या नवीन मार्गदर्शकतत्त्वामध्ये फेस मास्क कोणी घालावा तसेच कोणत्या परिस्थितीत घालावा आणि त्याची पत किंवा कशापासून बनवलेले असावे याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

विशेष म्हणजे, मास्क घालण्याच्या या मार्गदर्शक सूचनांसाठी डब्ल्यूएचओवर टीकादेखील झाली आहे. असे म्हटले गेले की, डब्ल्यूएचओकडून मास्क वापरण्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना लवकर न देण्यात आल्यामुळे कोरोना जगभरात वेगाने पसरला.

मास्क अशा प्रकारचे असावेत
जागतिक आरोग्य संघटनेने मास्कच्या गुणवत्तेविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की नवीन संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कपडे आणि इतर प्रकारच्या मास्कशी संबंधित माहिती सांगितली आहे. आपल्याला बाजारपेठेतून फेस मास्क विकत घेता येतात तसेच ते घरीही बनवता येतात मात्र त्यामध्ये तीन प्रकारचे थर असावेत. पहिला अस्तरचा थर, पॉलिस्टरचा बाहेरील थर आणि मध्यभागी पॉलीप्रॉपिलिनने बनलेला ‘फिल्टर’ स्तर असा बनवलेला मास्क घालावा.

जागतिक आरोग्य संघटनेने असेही म्हटले आहे की सर्व देशांनी गर्दी असलेल्या ठिकाणी मास्क घालण्यास लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. तसेच अशा ठिकाण जेथे सामुदायिक संप्रेषणासारख्या परिस्थितीत आहेत जसे कि रेल्वे तसेच बस स्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी देखील मास्क वापरता येतील.

संघटनेच्या महासंचालकांनी बचाव केला
डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस अ‍ॅडेनोम यांनी चेतावणी दिली आहे की, फेस मास्कवर जास्त अवलंबून राहणे देखील टाळले पाहिजे. त्यांच्या मते, फेस मास्क हा रोगाचा पराभव करण्यासाठी सुरु असलेल्या व्यापक रणनीतीचा एक भाग आहे मात्र यांबरोबरच इतर सावधगिरीचे उपाय देखील अवलंबणे तितकेच महत्वाचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment