हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या वुहाननंतर कोरोनाव्हायरसने इटलीच्या लोम्बार्डी शहराला आपला मजबूत बालेकिल्ला बनविला आहे.येथे सतत नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की या शहरातील मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठीसुद्धा प्रतीक्षा यादी तयार केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३,९२७ वर पोहचल्यामुळे लोम्बार्डीतील रूग्णालयांनी यावर तोडगा काढण्याची मोहीम हाती घेतली. असा विश्वास आहे की या शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीमुळे संपूर्ण देशात हा संसर्ग पसरला.३८ वर्षीय या व्यक्तीला ‘पेशंट १’ म्हणून ओळखले जात आहे.
संसर्ग इतक्या वेगाने पसरला की त्याला सुपर-स्प्रेडर देखील म्हटले जात आहे. इटलीचे पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांनी कोरोना विषाणूबद्दलच्या एका पत्रकार परिषदेत एका रुग्णालयाला कोरोना संसर्गासाठी दोषी ठरवले आणि असे म्हटले की रुग्णालयाने पेशंट १ ला २ वेळा घरी परत सोडले होते,जेव्हा कि तो तापाने आजारी असलेला माणूस स्वतः रुग्णालयात दाखल झाला होता.पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा चीनच्या परीस्थितीची बातमी जगभरात पसरली होती, तेव्हा रुग्णालय प्रशासनाने सावध राहिले पाहिजे होते आणि ताप किंवा श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या रुग्णाला परत पाठवण्यात यायचे नव्हते.
या पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी रुग्णालयाचे नाव घेतले नाही किंवा त्या व्यक्तीचेही नाव जाहीर केले नाही. तथापि,त्याला मॅटियाअसेही म्हटले जात आहे, जे इटलीतील एक लोकप्रिय नाव आहे. मिलानमधील रूग्णालयात आजही या रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या आजाराच्या काळात, हा रुग्ण, बर्याच लोकांना भेटला, खेळात सहभागी झाला आणि ऑफिसमध्येही गेला. त्याला सर्दी आणि ताप आला होता आणि १४ फेब्रुवारीला तो लोम्बार्डीच्या रुग्णालयात पोहोचला. तेथे पॅरासिटामोल देण्यात आले आणि कोणतीही चौकशी न करता त्याला घरी पाठविण्यात आले.२ दिवसांनंतरही ,तापात कोणताही फरक पडला नसल्याने १६ फेब्रुवारी रोजी तो पुन्हा त्याच रुग्णालयात पोहोचला, परंतु डॉक्टरांनी त्याला परत पाठवले.
तिसऱ्यांदा १९ फेब्रुवारीला जेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक झाली तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला श्वास घेण्यास त्रास, ताप आणि घशात तीव्र वेदना होत होत्या. मग तपासणी झाली, ज्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. यावेळी त्याच्या पत्नीला संसर्ग झाला जी गर्भवती होती. सकाळी एक रुग्ण त्याच्याबरोबर धावण्यासाठी जायचा, तो ही पॉझिटिव्ह आढळून आला. ज्या तीन वयस्कर व्यक्ती त्याला बारमध्ये जवळजवळ दररोज भेटत असे त्यादेखील पॉझिटिव्ह झाल्या. या व्यतिरिक्त, हॉस्पिटल मधील ८ लोकं आणि जो कोणी त्याच्या संपर्कात आला होता, ते सर्व कोरोना विषाणूने संक्रमित आहे. यातील एका रूग्णाचा मृत्यूही झाला आहे. रुग्णालयाने रुग्णाबाबत असा निष्काळजीपणा दाखविला की तिसऱ्यांदा जाऊन दाखल केल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यावरही सुमारे ३६ तास त्याला आइसोलेशनमध्ये ठेवण्यात आले नाही. तेच ते ३६ तास होते ज्यामध्ये डॉक्टर आणि इतर रुग्णांसह रुग्णालयात येणारे लोक यांना एकामागोमाग एक संसर्ग झाला.
रुग्णालये आणि डॉक्टरांच्या दुर्लक्षाबद्दल स्वत: पंतप्रधानांशी बोलल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य वॉल्टर रिक्कार्डी म्हणाले की, जगभरातील आपत्कालीन विभागात तैनात असलेल्या प्रत्येक डॉक्टरांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणताही रुग्ण या धोकादायक विषाणूचा प्रसार करणारा (वाहक) असू शकतो. . म्हणूनच, श्वास किंवा तापाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांना गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००
खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट
कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?
तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश