कोण असतील अमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस यांच्या पदाचे प्रबळ दावेदार?

0
119
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत ॲमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस हे आपल्या पदावरून निवृत्ती घेऊ शकतात. जेफ बेजोस यांनी आपल्या पदाचा त्याग केल्यानंतर ॲमेझॉनच्या कार्यकारी अधिकारी या सर्वोच्च पदाचा दावेदार म्हणून, अमझोन वेब सर्विसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एंडी जेसी यांच्याकडे पाहिले जात आहे. कोण आहेत एंडी जेसी? जाणून घेऊया जेसी यांच्याबद्दल अधिक माहिती…

चालू आर्थिक वर्षामध्ये ॲमेझॉन कंपनीने सलग तिसऱ्या वेळी आपलेच रेकॉर्ड तोडत प्रचंड फायदा मिळवला आहे. कंपनीची तिमाही विक्री ही 130 बिलियन डॉलर पेक्षाही जास्त झाली आहे. भारतीय रुपयांमध्ये याचा विचार केल्यास ही रक्कम 9 लाख 48 हजार 253 कोटी रुपये इतकी मोठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कंपनीच्या सर्वोच्च पदावर कंपनीतीलच कोणी जबाबदार अधिकारी विराजमान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे एंडी जेसी यांचे नाव चर्चेत आले आहे.

53 वर्षीय जेसी यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल मधून 1997 साली पदवी घेतली. त्यानंतर ते ॲमेझॉनमध्ये नोकरीसाठी आले. ॲमेझॉनमध्ये आल्यानंतर त्यांनी ‘ अ‍ॅमेझॉन वेब सर्विसेस’ची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी ‘क्लाऊड प्लॅटफॉर्म’ विकसित केला. जेसी यांनी विकसित केलेल्या ओरॅकल कॉर्प आणि क्लाऊड प्रतिद्वंदी मायक्रोसॉफ्ट कॉर्पला मोठी टक्कर दिली आहे. यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीची जागा कोण घेईल यावर त्यांचे नाव वारंवार चर्चेत आल्याचे दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here